कोपरगावात 18 जण करोना संक्रमित

कोपरगावात 18 जण करोना संक्रमित

कोपरगाव|तालुका प्रतिनिधी|Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात करोना आपला विळखा घट्ट करत आहे. शनिवारी 73 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यात 18 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. करोनावर मात करणार्‍या 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यात पहिला करोना रुग्ण लक्ष्मीनगर येथे 10 एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर कोपरगाव शहर व तालुका बर्‍यापैकी करोना मुक्त म्हणून नियंत्रणात होता. मात्र मागील आठवडाभरा पासून कोपरगाव तालुक्याला करोना साथीचे ग्रहण लागले आहे.

शुक्रवार दि 7 ऑगस्ट रोजी 33 रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कातील 73 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यात 18 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले. करोनावर मात करणार्‍या 30 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात दि. 8 ऑगस्ट पर्यंत ऐकूण 328 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 188 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तर आजपर्यंत 1 हजार 979 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com