करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

कोपरगावात 82 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू

11 महिन्यांच्या मुलासह 33 रुग्ण पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी एकाच दिवसात 65 करोना बाधित रुग्णांमुळे गेल्या सहा महिन्यांतील सर्वात मोठ्या रुग्ण वाढीचा विक्रम केला होता. त्या रुग्णांच्या संपर्कातील 194 व्यक्तींची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली त्यात 32 अहवाल पॉझिटिव्ह आले तर अहमदनगर येथे तपासणीसाठी 16 स्रावांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असे 33 अहवाल पॉझिटिव्ह आले असून ब्राम्हणगाव येथील 82 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात पहिला करोना रुग्ण लक्ष्मीनगर येथे 10 एप्रिल रोजी आढळला होता. त्यानंतर कोपरगाव शहर व तालुका बर्‍यापैकी करोना मुक्त म्हणून नियंत्रणात होता. मात्र मागील आठवडाभरापासून कोपरगाव तालुक्याला करोना साथीचे ग्रहण लागले असून एका पाठोपाठ रुग्ण संख्येची वाढ होताना दिसत आहे.

काल सापडलेल्या 65 रुग्णांत रवंदे येथे सात, पोहेगाव येथे चार रुग्ण, जेऊर पाटोदा येथील 11 महिन्यांचे बाळ व 2 स्रिया, टाकळीत 24 वर्षीय तरुण व2 स्रिया , संजीवनी कारखाना येथील 31 वर्षीय पुरुष तर 2 स्रिया, सोनारी येथील 35 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. कारवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, 2 स्रिया, कोळगाव थडी येथे 79 वर्षीय स्त्री व निवारा परिसर येथे एक 28 वर्षीय स्त्री बाधित आढळली आहे. तर टाकळी फाटा येथे 40 वर्षीय पुरुष, ब्राम्हणगाव येथे 41 वर्षीय पुरुष,शिंगणापूर येथे 67 वर्षीय पुरुष ,येसगाव येथे 50 वर्षीय पुरुष,चांदेकसारे येथे 65 वर्षीय पुरुष, अंचलगाव 62 वर्षीय पुरुष आदी बाधित रुग्ण आढळले आहेत. तर काल अहमदनगर येथे पाठवलेल्या एका 82 वर्षीय ब्राम्हणगाव येथील पुरुषाचे निधन झाले आहे. तर 25 रुग्णांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात दि. 7 ऑगस्टपर्यंत एकूण 310 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 200 रुग्ण अ‍ॅॅक्टिव्ह आहेत तर आजपर्यंत एकूण 1 हजार आठशे 95 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com