कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 5 डिसेंबर रोजी सापडलेल्या 15 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 25 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 3 तर खासगी लॅब मधील 1 असे 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली .

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील बालाजी आंगण येथील 2, गोकुळ नगरी येथील 1, लक्ष्मीनगर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. कोपरगाव तालुक्यात काल दि. 6 डिसेंबरपर्यंत 2 हजार 492 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 357 रुग्ण बरे झाले आहे.

तर कालपर्यंत 17 हजार 485 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्यांची टक्केवारी 14.25 आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.64 टक्के आहे. तर 41 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.