कोपरगावात 9 रुग्ण करोना संक्रमित
सार्वमत

कोपरगावात 9 रुग्ण करोना संक्रमित

Arvind Arkhade

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 10 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 8 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 25 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या अहवालांपैकी काल मंगळवार दि. 11 ऑगस्ट रोजी 7 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

नगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी 28 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात आढळलेल्या करोना बाधितांमध्ये कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथील 27 वर्षीय महिला, भवानी चौक येथील 48 वर्षीय पुरुष, धारणगाव रोड येथील 58 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला तर शहरातील 50 वर्षीय पुरुष, सुभाष नगर येथील 52 वर्षीय पुरुष, टिळक नगर येथील 30 वर्षीय पुरुष, पोहेगाव येथील 31 व 62 वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.

तर 28 करोना बाधित रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच 8 जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठवले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

कोपरगाव तालुक्यात दि. 11 ऑगस्टपर्यंत एकूण 351 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 136 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. तर आजपर्यंत एकूण 2 हजार 84 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे. 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com