कोपरगावात 34 करोना संक्रमित

कोपरगावात 34 करोना संक्रमित

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 19 सप्टेंबर रोजी सापडलेल्या 53 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 156 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 24 रुग्ण तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्यांपैकी 6 रुग्ण तसेच खासगी लॅब मधील 4 रुग्ण असे एकूण 34 रुग्ण करोना बाधित आढळून आले. 42 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एकूण 34 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शहरातील सुभद्रानगर येथील 2, अन्नपूर्णा नगर येथील 1, निवारा येथील 2, टाकळी नाका येथील 4, कर्मवीर नगर येथील 1,

रिद्धी सिद्धीनगर येथील 1, धारणगाव रोड येथील 1, साईधाम येथील 1, कापड बाजार येथील 1, तेरा बंगले येथील 1, तर ग्रामीण मधील उक्कडगाव येथील 3, वारी येथील 2, साखरवाडी येथील 5, संजीवनी येथील 2, मढी येथील 1, कान्हेगाव येथील 1, बहादरपूर येथील 1, येसगाव येथील 1, कोकमठाण येथील 1, जवळके येथील 1, कोळपेवाडी येथील 1 असे आज दिवसभरात एकूण 34 रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तर 42 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 20 सप्टेंबर पर्यंत एकूण एक हजार 520 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 172 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 322 रुग्ण बरे झाले आहेत.

तर आजपर्यंत 6 हजार 404 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 23.73 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.71 टक्के असे आहे. तर 26 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com