कोपरगावात आढळले 20 करोना बाधित
सार्वमत

कोपरगावात आढळले 20 करोना बाधित

Arvind Arkhade

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 11 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 9 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 45 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली या अहवालांपैकी बुधवारी 17 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

नगर येथे काल पाठवलेल्या अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. असे दिवसभरात 20 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. बुधवारी 47 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात आढळून आलेल्या करोना बाधित रुग्णांमध्ये शहरातील सुभद्रानगर येथील 5 रुग्ण, धारणगाव रोड येथील 55,26,20 वर्षीय पुरुष, गांधी नगर येथील 17 व 20 वर्षीय पुरुष, 39 व 16 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथील 52 वर्षीय पुरुष, साई प्रभा नगर येथील 34 वर्षीय पुरुष, काले टॉवर येथील 35 वर्षीय पुरुष, तर तालुक्यातील चांदेकसारे येथील 32 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

नगर येथे पाठवलेल्या स्राव यामधील 67 वर्षीय पुरुष गजानन नगर, 42 वर्षीय पुरुष लक्ष्मी नगर, 40 वर्षीय पुरुष इंदिरा नगर यांचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यात 12 ऑगस्ट पर्यंत 2 हजार 129 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. एकूण 371 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यातील 109 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com