कोपरगावमध्ये एका दिवसात करोनाचे अर्धशतक
सार्वमत

कोपरगावमध्ये एका दिवसात करोनाचे अर्धशतक

एकाचा बळी

Arvind Arkhade

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 17 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 33 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 122 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या अहवालांपैकी मंगळवार दि. 18 ऑगस्ट रोजी 51 करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असून 61 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तसेच आज 19 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

काल करोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील 2, यशवंत चौक येथील 7, दत्त नगर येथील 4, टिळकनगर येथील 2, बँक रोड येथील 2, जुने पोष्ट ऑफिस येथील 1,खडकी येथील 1, सुभाषनगर येथील 1, टिळकनगर येथील 1, धारणगाव रोड येथील 2, सुभद्रानगर येथील 2, विवेकानंद नगर येथील 3, तेरा बंगले येथील 1, सेवा निकेतन परिसरातील 2, गांधी नगर येथील 3, छ . शिवाजी महाराज रोड येथील 1, राम मंदिर परिसरातील 2 असे शहरातील 37 तर तालुक्यातील सुरेगाव येथील 1, खोपडी येथील 1, ब्राह्मणगाव येथील 3, कासली येथील 1, देर्डे चांदवड येथील 2, टाकळी येथील 2, अंचलगाव येथील 3, जेऊर कुंभारी येथील 1 असे एकूण 51 रुग्ण आज दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यात दि. 18 ऑगस्ट पर्यंत एकूण 509 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 151 रुग्ण अ‍ॅॅक्टिव्ह आहेत तर आजपर्यंत एकूण 2 हजार 509 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 8 व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com