कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 23 डिसेंबर रोजी सापडलेल्या 11 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 50 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 4 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 2 तसेच खासगी लॅबमधील 5 असे एकूण 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 46 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात एकूण 11 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील कोर्ट रोड येथील 1, महादेव नगर येथील 1, कोपरगाव येथील 2, शिवाजी रोड येथील 2 तर तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील 4, चासनळी येथील 1 असे 11 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात 24 डिसेंबर पर्यंत 2 हजार 637 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 547 रुग्ण बरे झाले आहेत. तर आजपर्यंत 18 हजार 661 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.