कोपरगावात दोन दिवसांत करोनाचे 39 नवे रुग्ण

कोपरगावात दोन दिवसांत करोनाचे 39 नवे रुग्ण

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 14 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 8 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 47 व्यक्तींचे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या अहवालांपैकी शनिवार 15 ऑगस्ट रोजी 18 करोना बाधित रुग्ण सापडले आहे. तर 15 ऑगस्ट रोजी सापडलेल्या 18 रुग्णांच्या संपर्कातील 36 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

यापैकी 16 पॉझिटिव्ह आले आहेत. तर नगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या 10 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांत 39 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

रविवारी 23 रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दोन दिवसांत एकूण 83 व्यक्तींची अँटीजेन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून यात 34 रुग्ण करोना बाधित आढळले आहेत. तर 10 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 5 पॉझिटिव्ह तर 5 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

शनिवारी सापडलेले कोपरगाव शहरातील निवारा कॉर्नर येथील 29 वर्षीय पुरुष तर 50 वर्षीय महिला, इंदिरा पथ येथील 54 वर्षीय पुरुष, संजीवनी येथील 30 वर्षीय महिला, समता नगर येथील 27,16 वर्षीय पुरुष, तर 7, 14, 7, 33 वर्षीय महिला, औद्योगिक वसाहत येथील 53 वर्षीय पुरुष, विवेकानंद नगर येथील 42,68,44 पुरुष, 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

तर रविवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये साईनाथनगर मधील 56 पुरुष,संजीवनी वसाहत येथील 69 वर्षीय पुरुष, समता नगर येथील 46 वर्षीय पुरुष, सिद्धी विनायक नगर 33 वर्षीय पुरुष, कुलस्वामिनी मंगल कार्यालय 52 वर्षीय पुरुष तर 51 वर्षीय महिला, इंदिरा पथ येथील 44 वर्षीय पुरुष, कृषी मित्र सोसायटी येथील 10 वर्षीय मुलीसह 65 वर्षीय पुरुष, विवेकानंद नगर येथील 63, 37,11 वर्षीय महिला, गोदाम गल्ली येथील 64, 13, 10 वर्षीय महिला तर गांधी नगर येथील 18 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

नगर येथे पाठवलेल्या अहवालातील जोशीनगर येथील 31 वर्षीय पुरुष, तालुक्यातील सोनेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, चांदेकसारे 60 वर्षीय महिला, टिळक नगर येथील 42 वर्षीय पुरुष, राजपाल सोसायटी येथील 57 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. शनिवारी 18 रुग्ण करोना बाधित तर रविवारी 21 रुग्ण बाधित आढळून आले आहे.तालुक्यात 424 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 78 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com