corona
corona
सार्वमत

कोपरगाव शहरात तिघे करोना बाधित

Arvind Arkhade

कोपरगाव|तालुका प्रतिनिधी|Kopargav

कोपरगाव शहरात 3 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यात सुख शांती नगर, सहजानंदनगर आणि धारणगाव येथील 2 पुरुष 1 महिलेचा समावेश आहे. करोना बाधित रुग्णांचा परिसर सील करण्याचे प्रशासनाचे काम सुरू असून तालुक्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 15 झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील करोना चाचणीचे प्रलंबित असलेले 14 अहवाल काल सायंकाळी प्राप्त झाले, त्यापैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले तर 11 निगेटिव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली. बाधित रुग्णांत कोपरगाव शहरातील सुख शांती नगर येथील 55 वर्षीय पुरुष, सहजानंदनगर येथील 52 वर्षीय पुरुष तसेच धारणगाव येथील 30 वर्षीय महिला हे तिघे आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाच्यावतीने शोध घेऊन क्कारंटाईन करण्याचे काम सुरू आहे.

कोपरगाव तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आज अखेर 28 झाली असून त्यापैकी एक महिला मयत झाली आहे, 15 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर उर्वरित 12 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com