कोपरगावात 114 रुग्णांची भर

तालुक्यातील पाच करोना रुग्णांचा मृत्यू
कोपरगावात 114 रुग्णांची भर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 17 मे रोजी सापडलेल्या 64 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 55 तर खासगी लॅब मधील 31 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 28 असे एकूण 114 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

तालुक्यातील चासनळी येथील 75 वर्षीय पुरुष, वारी येथील 59 वर्षीय पुरुष, टाकळी येथील 70 वर्षीय महिला, कासली येथील 53 वर्षीय पुरुष तर शहरातील गांधीनगर येथील 57 वर्षीय पुरुष अशा पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 114 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. त्यात कोपरगाव येथील 3, टिळकनगर येथील 1, ओमनगर येथील 2, गांधीनगर येथील 3, गवारेनगर येथील 3, लक्ष्मीनगर येथील 2, अन्नपूर्णानगर येथील 2, सप्तर्षी मळा येथील 2, गजानननगर येथील 1, निवारा येथील 1, खडकी येथील 3, समता नगर येथील 1, द्वारकानगरी येथील 1, गोरोबानगर येथील 1, सह्याद्री कॉलनी येथील 1, वडांगळे वस्ती येथील 1, येवला रोड येथील 6, बाजारतळ येथील 1, सुभाषनगर येथील 1, इंदिरापथ येथील 1 तर ग्रामीण मधील कोल्हेवस्ती येथील 3, जेऊर कुंभारी येथील 4, कोळपेवाडी येथील 2, कोकमठाण येथील 1, मायगाव देवी येथील 1, संजीवनी येथील 2, सावळीविहीर येथील 1, उक्कडगाव येथील 1, खिर्डीगणेश येथील 3, टाकळी येथील 4, वेळापूर येथील 1, सुरेगाव येथील 4, धामोरी येथील 1, संवत्सर येथील 1, शिंगणापूर येथील 4, काकडी येथील 1, चांदेकसारे येथील 5, वारी येथील 3, भोजडे येथील 1, घोयगाव येथील 3, कासली येथील 2, दहिगाव येथील 2, गोधेगाव येथील 2, करंजी येथील 1, पढेगाव येथील 1, कारवाडी येथील 2, रवंदे येथील 4, कुंभारी येथील 1, बोलकी येथील 2, मूर्शतपूर येथील 2, माहेगाव येथील 1, नाटेगाव येथील 1, मळेगाव थडी येथील 1, येसगाव येथील 2, मंजूर येथील 1, ब्राम्हणगाव येथील 1, चासनळी येथील 1 असे 114 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 18 मे पर्यंत एकूण 11 हजार 257 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दहा हजार 221 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 859 अ‍ॅक्टिव पेशंट आहे तर आजपर्यंत एकूण 49 हजार 852 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 22.58 आहे तर मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के असे आहे. 177 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com