कोपरगावात 143 रूग्णांची भर करोनाने एकाचा मृत्यू

कोपरगावात 143 रूग्णांची भर करोनाने एकाचा मृत्यू
corona

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 11 मे रोजी सापडलेल्या 157 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 79 तर खासगी लॅब मधील 48 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 16 असे ऐकून 143 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर तालुक्यातील अंचलगाव येथील 65 वर्ष वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 143 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातीलब्रिजलाल नगर येथील 1, अंबिका नगर येथील 2, भगवती कॉलनी येथील 1, साईसिटी येथील 1, गवारे नगर येथील 2, खडकी येथील 1, बेट येथील 3, गांधींनगर येथील 1, निवारा येथील 1, पोलिसस्टेशन येथील 1, गोरोबा नगर येथील 1, कोपरगाव येथील 1, येवला रोड येथील 1, सुभद्रा नगर येथील 1, ओम नगर येथील 3, लक्ष्मी नगर येथील 1, राम मंदिर जवळ येथील 1,तेरा बंगले येथील 1,ब्राम्हण गल्ली येथील 1, अंबिका चौक येथील 1, इंदिरापथ येथील 15, गजानन नगर येथील 1, कोर्ट रोड येथील 1 तर ग्रामीण मधील वारी येथील 13, येसगाव येथील 7, तिळवणी येथील 1, डाऊच येथील 3, हिंगणी येथील 1, खिर्डी गणेश येथील 1, टाकळी येथील 3, रवंदे येथील 2, ब्राम्हणगाव येथील 1, सोनारी येथील 1, कुंभारी येथील 2, नाटेगाव येथील 2, धोत्रे येथील 1, कान्हेगाव येथील 2, घारी येथील 2, पांगरी येथील 1, बहादरपूर येथील 1, माहेगाव देशमुख येथील 2, नगदवाडी येथील 1, वेळापूर येथील 2, बक्तरपूर येथील 1, कारवाडी येथील 5, धामोरी येथील 1, संवत्सर येथील 4, करंजी येथील 10, शिंगणापूर येथील 4, कोकमठाण येथील 2, भोजडे चौकी येथील 1, कोळगाव थडी येथील 1, गोधेगाव येथील 1, संजीवनी येथील 1, पढेगाव येथील 4, आंचलगाव येथील 1, मंजूर येथील 1, पोहेगाव येथील 1,सडे येथील 1, नाटेगाव येथील 1, कोळपेवाडी येथील 3, जे. कुंभारी येथील 1 असे 157 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 12 मे पर्यंत ऐकून दहा हजार 565 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून आठ हजार 306 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1192 क्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत ऐकून 43 हजार 81 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 24.10 तर मृत्यू चे प्रमाण 1.41 टक्के आहे. आतापर्यंत 158 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com