कोपरगावात पुन्हा 12 रूग्णांची भर

कोपरगावात पुन्हा 12 रूग्णांची भर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात दि. 26 डिसेंबर रोजी सापडलेल्या 1 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 30 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 7 तर खासगी लॅब मधील 5 असे एकूण 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 23 व्यक्तींचे करोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे कल एका दिवसात एकूण 12 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे.त्यात शहरातील वडांगळे वस्ती येथील 3, सुभद्रानगर येथील 4 तर तालुक्यातील मुर्शतपूर येथील 2, जेऊर पाटोदा येथील 2, पोहेगाव येथील 1 असे 12 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

कोपरगाव तालुक्यात दि. 27 डिसेंबर पर्यंत एकूण दोन हजार 657 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 563 रुग्ण बरे झाले आहे. तर आजपर्यंत एकूण 18 हजार 771 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 14.15 तर मृत्यूचे प्रमाण 1.62 टक्के आहे. आतापर्यंत 43 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com