कोपरगावात गुरूवारी तिघांचा करोनाने मृत्यू

दिवसभरात सापडले 202 करोना संक्रमित रूग्ण
कोपरगावात गुरूवारी तिघांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 28 एप्रिल रोजी सापडलेल्या 153 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 82 तर खासगी लॅब मधील 6 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 114 असे 202 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर शहरातील 70 व 56 वर्षीय पुरुष, तर ब्राम्हणगाव येथील 45 वर्षीय महिला या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात 202 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.त्यात शहरातील 11, खडकी येथील 12, लक्ष्मीनगर येथील 6, निवारा येथील 4, इंदिरानगर येथील 3, अंबिका नगर येथील 4, गोरोबा नगर येथील 3, धारणगाव रोड येथील 4, शारदा नगर येथील 2, येवला रोड येथील 2, सह्याद्री कॉलनी येथील 2, मोहिनीराज नगर येथील 2, साईसिटी येथील 2, जपे हॉस्पिटल मागे येथील 1, शिंगी शिंदे नगर येथील 1, शिवाजी रोड येथील 1, जानकी विश्र् येथील 1, टिळक नगर येथील 1, ब्राम्हणगल्ली येथील 1, महादेव नगर येथील 1, पोष्ट ऑफिस येथील 1, आण्णाभाऊ साठे चौक येथील 1, विवेकानंद नगर येथील 1, सुभद्रा नगर येथील 1, गोकुळ नगरी येथील 1, तर ग्रामीण मधील ब्राम्हणगाव येथील 23, करंजी येथील 10, संवत्सर येथील 8, मूर्शतपूर येथील 8, जे. पाटोदा येथील 6, कोळपेवाडी येथील 5, घोयगाव येथील 4, बोलकी येथील 4, टाकळी येथील 4, पढेगाव येथील 4, कोकमठाण येथील 3, भोजडे येथील 3, दशरथ वाडी येथील 3, धामोरी येथील 3, कोळगाव थडी येथील 3, कुंभारी येथील 3, आंचलगाव येथील 3, येसगाव येथील 3, चासनळी येथील 3, वारी येथील 2, संजीवनी येथील 2, कारवाडी येथील 2, मंजूर येथील 2, पोहेगाव येथील 2, जे. कुंभारी येथील 2, धारणगाव येथील 2, सांगवी भुसार येथील 2, शहाजापूर येथील 1, सोनेवाडी येथील 1, शिरसगाव येथील 1, मोर्विस येथील 1, बक्तरपूर येथील 1, मायगाव देवी येथील 1, चांदेकसारे येथील 1, मळेगाव थडी येथील 1, ओगदि येथील 1, शिंगणापूर येथील 1 असे आज दिवसभरात एकूण 202 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात 29 एप्रिल पर्यंत 8 हजार 736 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 6 हजार 521 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1187 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. 31 हजार 984 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 22.08 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 129 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com