कोपरगावात 128 करोना रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू

कोपरगावात 128 करोना रुग्णांची भर, तिघांचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 13 मे रोजी सापडलेल्या 89 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली, त्यात 76 तर खासगी लॅब मधील 46 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 6 असे 128 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर शहरातील समतानगर येथील 49 वर्षीय महिला, समतानगर येथील 65 वर्षीय पुरुष तर कुंभारी येथील 77 वर्षीय पुरुष या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 128 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील 2, महादेव नगर येथील 1, लक्ष्मीनगर येथील 4, सुभद्रानगर येथील 2, गजानन नगर येथील 5, पो. स्टेशन समोर येथील 1, शारदा नगर येथील 1, निवारा येथील 1, इंदिरा पथ येथील 1, ओम नगर येथील 1, बंब प्लाझा येथील 1, बैल बाजार रोड येथील 2, काले मळा येथील 1, तर ग्रामीण मधील सुरेगाव येथील 21, कोकमठाण येथील 15, येसगाव येथील 5, कारवाडी येथील 5, आंचलगाव येथील 5, संवत्सर येथील 5, कोळपेवाडी येथील 5, शिंगणापूर येथील 4, पोहेगाव येथील 4, तिळवणी येथील 4, माहेगाव देशमुख येथील 3, संजीवनी येथील 2, घारी येथील 2, नाटेगाव येथील 2, वारी येथील 2, ब्राम्हणगाव येथील 2, लक्ष्मीवाडी येथील 2, जेऊर पाटोदा येथील 1, टाकळी येथील 1, जेऊर कुंभारी येथील 1, कुंभारी येथील 1, पाथरे येथील 1, कान्हेगाव येथील 1, साकरवाडी येथील 1, सोनार वस्ती येथील 1, सांगवी भुसार येथील 1, चासनळी येथील 1, टाकळी रोड येथील 1, सडे येथील 1, चांदगव्हाण येथील 1, गोधेगाव येथील 1, कासली येथील 1 असे 128 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कोपरगाव तालुक्यात 14 मे पर्यंत 10 हजार 882 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 9 हजार 596 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 1121 अ‍ॅक्टिव पेशंट आहे. तर आजपर्यंत 45 हजार 678 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारि 23.82 आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.52 टक्के असे आहे. तर 165 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com