कोपरगावात करोनाचा उद्रेक, 24 तासांत 7 जणांचा मृत्यू

दिवसभरात सापडले 145 करोना पॉझिटिव्ह
कोपरगावात करोनाचा उद्रेक, 24 तासांत 7 जणांचा मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 19 एप्रिल रोजी सापडलेल्या 136 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 110 तर खासगी लॅब मधील 21 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 25 असे 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर कोपरगाव येथील 46 वर्षीय पुरुष,ग्रामीण रुग्णालय येथील 62 वर्षीय महिला, श्रद्धानगरी येथील 57 वर्षीय पुरुष, तालुक्यातील संवत्सर येथील 45 वर्षीय पुरुष, कुंभारी येथील 50 वर्षीय पुरुष, हंडेवाडी येथील 60 वर्षीय महिला, येसगाव येथील 55 वर्षीय महिला या सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 145 व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील 7, निवारा येथील 5, सुभद्रा नगर येथील 5, साईसिटी येथील 4, येवला रोड येथील 3, ईशान नगर येथील 3, अन्नपूर्णा नगर येथील 2, खडकी येथील 2, गौरीशंकर हौसिंग येथील 2, भगवती कॉलनी येथील 2, मार्केट यार्ड येथील 2, सप्तर्षी मळा येथील 2, कापडबाजार येथील 1, इंदिरापथ येथील 1, गजानन नगर येथील 1, ओम नगर येथील 1, महादेव नगर येथील 1, हनुमान नगर येथील 1, लक्ष्मी नगर येथील 1, सह्याद्री कॉलनी येथील 1, साईनगर येथील 1, द्वारका नगरी येथील 1, गुलमोहोर सोसायटी येथील 1, धारणगाव रोड येथील 1 तर ग्रामीण मधील ब्राह्मणगाव येथील 12, कुंभारी येथील 8, कोकमठाण येथील 7, धारणगाव येथील 6, टाकळी येथील 5, कोळपेवाडी येथील 4, घारी येथील 4, शहाजापूर येथील 3, मढी येथील 3, जेऊर पाटोदा येथील 3, सुरेगाव येथील 3, सोनारी येथील 3, खोपडी येथील 3, करंजी येथील 3, संजीवनी येथील 2, धामोरी येथील 2, येसगाव येथील 2, रवंदे येथील 2, वारी येथील 2,चांदेकसारे येथील 2, संवत्सर येथील 2, भोजडे येथील 2, दशरथ वाडी येथील 1, भोकर येथील 1, स्टेशन रोड येथील 1, डाऊच येथील 1, जे. कुंभारी येथील 1, पोहेगाव येथील 1, आपेगाव येथील 1, गोधेगाव येथील 1, बापतारा येथील 1, नाटेगाव येथील 1, विघनवाडी येथील 1, बोधेगाव येथील 1, मूर्शतपूर येथील 1, मंजूर येथील 1, खिर्डीगणेश येथील 1, नवलेवस्ती येथील 1, येसगाव येथील 1 असे 145 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

तालुक्यात 20 एप्रिलपर्यंत एकूण 7 हजार 466 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून सहा हजार 284 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 1 हजार 151 अ‍ॅक्टिव्ह पेशंट आहेत तर आजपर्यंत 30 हजार 711 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 22.08 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 90 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com