रविवारी पोहेगाव व देर्डे कोर्‍हाळे येथील दोघांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव तालुक्यात दिवसभरात सापडले 115 करोना पॉझिटिव्ह
रविवारी पोहेगाव व देर्डे कोर्‍हाळे येथील दोघांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 10 एप्रिल रोजी सापडलेल्या 182 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

त्यात 61 तर खासगी लॅब मधील 54 असे 115 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. तर तालुक्यातील देर्डे कोर्‍हाळे येथील 51 वर्षीय पुरुष व पोहेगाव येथील 55 वर्षीय महिला या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसभरात एकूण 115 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील विवेकानंद नगर 1 , गजानननगर 3, साईसिटी 4, ब्रिजलाल नगर 2, रिद्धी - सिद्धी नगर 1, बँक कॉलनी 1, येवला रोड 1, अंबिकानगर 1, शिवाजी रोड 6, जुनी कचेरी 2, वडांगळे वस्ती 1, द्वारकानगरी 1, कोपरगाव 4, सुभद्रानगर 1, कहार गल्ली महिला 1, ओमनगर 1, धारणगाव रोड 1, आंबेडकर नगर 1, साईनगर 1, लक्ष्मीनगर 2, इंदिरा पथ 2, महावीर पथ 1, ओमसाई दीप 2, गोरोबा नगर 1, देवी मंदिर 1, गोदाम गल्ली 1 , मंगल मूर्ती टॉवर 3, कालिंदीनगर 1, गुरुद्वारा रोड 1, गर्जे हॉस्पिटल 2 , आदींचा समावेश आहे.

तर ग्रामीण मधील वेळापूर 1, तीन चारी 2, माहेगाव देशमुख 2, जेऊर पाटोदा 2, रवंदे 3, कोळपेवाडी 7, कोकमठाण 3, मुखेड 1, मुर्शतपूर 2, संजीवनी 3, धारणगाव 1, करंजी 1, वारी 8, उक्कडगाव 1, मंजूर 1, हंडेवाडी 2, संवत्सर 3 , सडे 2, भोजडे 1, कान्हेगाव 3, शिंगवे 1, येसगाव 5, शिंगणापूर 3, ब्राम्हणगाव 1, चांदगव्हाण 1, डाऊच 1, चासनळी 1, मढी 1, दहिगाव 1 असे 115 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

कोपरगाव तालुक्यात 11 एप्रिलपर्यंत 6 हजार 96 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 5 हजार 20 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 990 अ‍ॅक्टिव्ह पेशंट आहेत. आज पर्यंत 26 हजार 163 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 32.77 टक्के आहे.तर मृत्यूचे प्रमाण 1.12 टक्के असे आहे. 68 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com