कोपरगावात करोनाचा तिसरा बळी
सार्वमत

कोपरगावात करोनाचा तिसरा बळी

60 वर्षीय महिलेचा मृत्यूः 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

कोपरगाव|तालुका प्रतिनिधी|Kopargav

शहरासह तालुक्यात सलग नवव्या दिवशी करोनाचा कहर कायम राहीला. शहर व तालुक्यात मंगळवारी सापडलेल्या 21 रुग्णांच्या संपर्कातील 175 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 30 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले तर स्वामी समर्थनगर येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

काल आढळलेल्या करोना बाधित रुग्णांत संजीवनी कारखान्यावरील 10 रुग्ण, शिंगणापूर येथील 6 रुग्ण, पोहेगाव येथील 6 रुग्ण, कोपरगाव येथील 2 रुग्ण, डाऊच खुर्द येथील 2, अंदरसुल, दहेगाव, कुंभारी, ब्राम्हणगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण असे 30 रुग्ण बाधित निघाले आहेत. शहरातील बैल बाजार रोड येथील 48 वर्षीय पुरुष तर साईबाबा कॉर्नर येथील 46 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

तालुक्यातील डाऊच खुर्द येथील 43 वर्षीय पुरुष तर 50 वर्षीय महिला, अंदरसुल येथील 55 वर्षीय पुरुष, दहेगाव येथील 48 वर्षीय पुरुष, कुंभारी येथील 55 वर्षीय पुरुष, ब्राम्हणगाव येथील 54 वर्षीय पुरुष आदी 30 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 16 जणांना घरी सोडण्यात आले असून करोनामुळे संजीवनी येथील एका पुरुषाचा व लक्ष्मीनगर येथील एका व स्वामी समर्थनगर येथील 60 वर्षीय महिला अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.

कोपरगाव तालुक्यात आज पर्यंत एकूण 1 हजार 621 लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे. दि. 5 ऑगस्ट पर्यंत एकूण 212 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 124 रुग्ण उपचार घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com