कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 4 एप्रिल रोजी सापडलेल्या 137 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 63 तर खासगी लॅब मधील 27 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 40 असे 130 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर खडकी येथील 56 वर्षीय महिला व वाणी सोसायटी येथील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसात एकूण 130व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहे. त्यात कोपरगाव येथील 22, खडकी रोड येथील 1, बुब हास्पिटल जवळ येथील 1, इंदिरानगर येथील 3, सह्याद्री कालनी येथील 1, विवेकानंदनगर येथील1, टिळेकर वस्ती येथील 1, गांधीनगर येथील 1, लक्ष्मीनगर येथील 3, सुभद्रानगर येथील 1, गजानन नगर येथील 3, शिवाजी रोड येथील 1, दत्तनगर येथील 1, गोकुळनगरी येथील 1, साई सिटी येथील 4, जोशी नगर येथील 2, जुनी कचेरी येथील 1, शारदानगर येथील 1, सह्याद्री कालनी येथील 2, बँक रोड येथील 2, इंदिरापथ येथील 3, येवला रोड येथील 2, पोलीस स्टेशन जवळ येथील 1, धांरणगाव रोड येथील 1, टाकळी रोड येथील 1, बस स्टन्ड जवळ येथील 1, गणपती मंदिर रोड येथील 1, जाधव वस्ती येथील 1, वंडागळे वस्तीयेथील 1, सम्यकनगर येथील 1, महाविर भवन येथील 1 तर ग्रामिण मधील चासनळी येथील 5, जेऊर कुंभारी येथील 4, शिगंणापुर येथील 6, दहेगाव येथील 2, कंरजी येथील 3, टाकळी येथील 13, सांगवी भुसार येथील 3, माहेगाव येथील 2, धारंणगाव येथील 2, कोकमठाण येथील 1, संवत्सर येथील 4, कान्हेगाव येथील 1, खिर्डी गणेश येथील 1, कोळपेवाडी येथील 2, रंवदा येथील 5, सुरेगाव येथील 2, मढी येथील 2, डाऊच येथील 1, पोहेगाव येथील 1, कारवाडी येथील 1, जेऊर पाटोदा येथील 1, धामारी येथील 1 असे 130 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज 6 एप्रिल पर्यंत 5 हजार 317 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून चार हजार 522 रुग्ण बरे झाले आहे. तसेच 713 अॅक्टिव पेशंट आहे तर आज पर्यंत एकुण 25 हजार 385 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.