रविवारी कोपरगावात तिघांचा करोनाने मृत्यू

दिवसभरात तालुक्यात सापडले 100 करोना बाधित
रविवारी कोपरगावात तिघांचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 17 एप्रिल रोजी सापडलेल्या 182 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 81 तर खासगी लॅब मधील 12 तसेच अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 7 असे एकूण 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर शहरातील सराफ बाजार येथील एक 66 वर्षीय पुरुष, तालुक्यातील देर्डे कोर्‍हाळे येथील 27 वर्षीय पुरुष व येसगाव येथील 50 वर्षीय पुरुष या तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात एकूण 100 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील 5, कापड बाजार येथील 2,साईसिटी येथील 2, मोहिनीराज नगर येथील 2, गुलमोहर कॉलनी येथील 1, इंदिरा नगर येथील 1, बेट येथील 2, निवारा येथील 2, सुभद्रा नगर येथील 3, येवला रोड येथील 1, बँक रोड येथील 1, खडकी येथील 1, ईशान नगर येथील 1, संभाजी चौक येथील 1, सह्याद्री कॉलनी येथील 1, द्वारकानगर येथील 1, देवी मंदिर जवळ येथील 1, गोदाम गल्ली येथील 1, ब्राम्हण गल्ली येथील 2, विवेकानंद नगर येथील 1 तर ग्रामीण मधील सुरेगाव येथील 1, धामोरी येथील 2, ब्राह्मणगाव येथील 1, धारणगाव येथील 8, जेऊर पाटोदा येथील 1, संवत्सर येथील 1, वारी येथील 3, मूर्शतपूर येथील 1, चांदेकसारे येथील 2, खिर्डी गणेश येथील 1, टाकळी येथील 4, कोळपेवाडी येथील 5, कोकमठाण येथील 2, कुंभारी येथील 1, सोनारी येथील 2, मंजूर येथील 1, सिन्नर येथील 1, बक्तरपूर येथील 1, लौकी येथील 1, शहाजापूर येथील 1, करंजी येथील 8, गोधेगाव येथील 7, धोत्रे येथील 9, भोजडे येथील 1, मढी येथील 2, दहेगाव येथील 1 असे 100 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

कोपरगाव तालुक्यात आज 18 एप्रिलपर्यंत एकूण सात हजार 185 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून पाच हजार 958 रुग्ण बरे झाले आहेत.तसेच 1145 अ‍ॅक्टिव्ह पेशंट आहेत तर आजपर्यंत एकूण 30 हजार 419 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांचे प्रमाण 22.08 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.11 टक्के असे आहे. तर 81 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतः काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com