कोपरगावात दोघींचा करोनाने मृत्यू

दिवसभरात 18 नवीन करोना संक्रमित
कोपरगावात दोघींचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 30 मे रोजी सापडलेल्या 80 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 16 तर अहमदनगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी 2 असे एखूण 18 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तालुक्यातील येसगाव येथील 60 वर्षीय महिला, इंदिरापथ येथील 90 वर्षीय महिला या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे आज दिवसभरात 18 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यात शहरातील लक्ष्मीनगर येथील 1, कालिकानगर येथील 2, येवला रोड येथील 2, टाकळी फाटा येथील 1, शारदानगर येथील 2 तर ग्रामीण मधील जातेगाव येथील 3, पढेगाव येथील 2, शिंगणापूर येथील 1, कोकमठाण येथील 1, भोजाडे येथील 1, पालखेड येथील 1, भास्कर वस्ती येथील 1 असे 18 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

कोपरगाव तालुक्यात दि. 31 मे पर्यंत 11 हजार 913 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून अकरा हजार 251 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 471 अ‍ॅक्टिव्ह पेशंट आहे तर आज पर्यंत 64 हजार 648 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 18.43 आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.60 टक्के आहे. आतापर्यंत 191 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com