कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी - ना. आशुतोष काळे

कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी - ना. आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

ना. आशुतोष काळे यांनी शहर विकासावर लक्ष केंद्रित करून प्रतिकूल परिस्थितीत कोपरगाव शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी देण्याचा ओघ सातत्याने सुरु असून पुन्हा एकदा कोपरगावच्या रस्त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने 5 कोटी निधी दिला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

खराब रस्त्यांमुळे कोपरगाव शहर नेहमी चर्चेत होते त्यामुळे उपहासात्मकपणे रस्त्यांच्या बाबतीत अनेक उपाध्या कोपरगाव शहराला मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत ना.आशुतोष काळे यांच्यापुढे कोपरगाव शहराच्या विकासाचे मोठे आवाहन होते. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या वजनाचा योग्य वापर करून विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघासाठी अडीच वर्षात एक हजार कोटी निधी खेचून आणला असून यामध्ये कोपरगाव शहर देखील अपवाद नाही.

कोपरगाव शहराला निधी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आणि त्यांची धडपड नेहमीच सुरुच असते. त्याच प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी ङ्गविशेष रस्ता अनुदानफ म्हणून 4 कोटी 65 लाख व वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत 35 लाख असा एकूण 5 कोटी रुपये निधी कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी दिला आहे. मागील काही वर्षापासून कोपरगाव शहरातील रस्ते हि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी समस्या झाली होती.

विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावांची महाविकास आघाडी सरकारने दखल घेवून 5 कोटी रुपये निधी दिला आहे.

Related Stories

No stories found.