कोपरगाव बसस्थानक इमारत पुनर्बांधणी व व्यापारी संकुलासाठी 14 कोटी मंजूर - ना. काळे

कोपरगाव बसस्थानक इमारत पुनर्बांधणी व 
व्यापारी संकुलासाठी 14  कोटी मंजूर - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रयत्नांना यश मिळून 14 कोटी निधी व्यापारी संकुलासाठी मंजूर झाला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहरासाठी 268 कोटी निधी आणला आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी 131.24 कोटी निधी 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला आहे. शहरातील रस्ते व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहराचे रूपडे बदलू लागले आहे. कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारले जाऊन स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता.

त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार कोपरगाव दौर्‍यावर आले असता त्यावेळी ना. काळे यांनी बस स्थानका लगतच्या व्यापारी संकुलासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी ना. पवार यांनी निधी देण्याची ग्वाही दिली होती. ना. पवार यांनी कोपरगाव शहर बस आगार इमारत पुनर्बांधणी व बस स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्यासाठी 14 कोटी निधी मंजूर केला आहे, अशी माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com