नगरसेवकांकडून पालिका अधिकार्‍यांवर आक्षेपार्ह टीका

कर्मचार्‍यांकडून नगराध्यक्ष वहाडणे यांना निवेदन
नगरसेवकांकडून पालिका अधिकार्‍यांवर आक्षेपार्ह टीका
कोपरगाव

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव (Kopargav) शहरातील 28 कामांना उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती (Temporary stay by the High Court) दिल्याने शहरातील राजकारण (Political) चांगलेच तापलेले असताना भाजपा व शिवसेनेच्या (BJP And Shivsena) काही नगरसेवकांनी (Corporators) पत्रकार परिषदेत पालिकेच्या बांधकाम अभियंत्यांवर खालच्या पातळीवर आक्षेपार्ह टीका (Criticized) केली. त्याच्या निषेधार्थ नगरपरिषदेच्या महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटनेच्यावतीने नुकतेच नगराध्यक्ष विजय वहाडणे (Vijay Vahadane) यांना निवेदन दिले .

निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव नगरपरिषदेचे (Kopargaon Municipal Council) अधिकारी व कर्मचारी अत्यंत कर्तव्यनिष्ठ काम करीत असताना त्यांच्यावर कोविड 19 (Covid 19) च्या कामाचा अतिरिक्त ताण असताना पालिका अधिकार्‍यांवर अशा पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन एकेरी भाषेत आक्षेपार्ह टीका केल्यामुळे मनोबल खच्चीकरण होत असून राजकीय आरोप (Political allegations) प्रत्यारोप करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन स्टंटबाजी करण्यासाठी अशा प्रकारची वैयक्तिक टीका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर करणे हे योग्य नाही. अशा परिस्थितीत सर्व मुख्याधिकारी संवर्गासह नगरपरिषद (Municipal Council) राज्य संवर्गातील अधिकारी व नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन आपले कर्तव्य प्रामाणीकपणे पार पाडण्याबाबत अनास्था तयार झाली आहे. शासकीय काम करत असताना आजी माजी नगरसेवक (corporator) यांचेकडून असे प्रकार यापुढे घडू नये याकरिता कठोर कायदे करून त्याची अंमलबजावणी वेगवान व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी नाशिक विभाग उपाध्यक्ष दिगंबर वाघ, पल्लवी सूर्यवंशी, तुषार नालकर, रोहित सोनवणे,दीपक बडगुजर, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, स्वेता शिंदे, ज्ञानेश्वर चकाने, संभाजी कार्ले, भालचंद्र उंबरजे, संजय तिरसे, राजेश गाडे, चंदू साठे, राजेंद्र शेलार, अरुण थोरात, रवी वाल्हेकर, मारिया दुशिंग, राजेंद्र इंगळे आदींसह नगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com