कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, परिचारिकेच्या तक्रारीनंतर कारवाई

कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, परिचारिकेच्या तक्रारीनंतर कारवाई

कोपरगाव (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या तहसीलदारांनी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचून रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करुन तेथे उपस्थित परिचारिकेच्या पाठीवर हात फिरवत तसेच रुग्णाच्या नातेवाईक मुलीच्या देखील अंगावर हात फिरवून विनयभंग केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत परीचारिकेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामिण रुग्नालय कोपरगाव येथे रात्र पाळी डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत. असे म्हणुन फिर्यादिने दिलेला डयुटी तक्ता फेकून देऊन वैद्यकीय अधिकारी यांना फिर्यादीचे फोन वरून शिवीगाळ करून फिर्यादीचे सोबत डयुटीस असलेला कक्ष सेवक सचिन टोंबरे यांना दवाखाण्याच्या बाहेर काढून दिले व फिर्यादीचे अंगावरून हात फिरवुन फिर्यादीकडे पाहुन फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

त्या नंतर तेथे असलेले पेशंटची नातेवाईक मुलगी हिला आवाज देऊन तीला जवळ बोलाऊन तीचा हात धरून तीच्या देखील अंगावरून हात फिरवुन गैरवर्तण करून शिवीगाळ करत हॉस्पीटल बाहेर निघुन गेले आहे. असे म्हटले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९०/२३ , भादंवी कलम ३५४,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com