कोपरगाव सबजेलमधून 50 आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी

कोपरगाव सबजेलमधून 50 आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दुय्यम कारागृहात 16 कैदी ठेवण्याची क्षमता असताना सद्यस्थितीत 91 कैदी ठेवल्याने आरोपींचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. तसेच झोपण्यासाठी तर लांबच मात्र उठण्या बसण्यासाठी देखील जागा नसल्याने कैद्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या विषयाकडे प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी लक्ष वेधले होते. त्यानंतर कोपरगावच्या तुरुंगाधिकार्‍यांनी आरोपींना अन्यत्र स्थलांतर करण्यासाठी पुणे येथील कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे परवानगी मागितली होती परवानगी मिळाल्यानंतर, मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कोपरगाव कारागृहातील 50 आरोपींना कडक पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.

यावेळी सर्व कैद्यांची कोविड टेस्ट करण्यात आली त्यानंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे सर्व कैद्यांची आरोग्य तपासणी करून रवाना करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी माणुसकीचे दर्शन घडवत सर्व कैद्यांना पाणी बॉटल उपलब्ध करून देत स्वतः त्याचे वाटप केले. कैदी स्थलांतर करण्यासाठी तहसीलदार विजय बोरुडे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी परिश्रम घेतले.91 पैकी 50 न्यायाधीन बंद्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याने कोपरगाव कारागृहातील उर्वरित कैद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com