कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

देशभरात लाॅकडाऊननंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलची किमत ९३ रुपयांवर तर डिझेलची किमत ८० रुपयांवर पोहोचली आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेने रस्त्यावर उतरत कोपरगाव शहरामध्ये आंदोलन केले.

कोपरगाव शहरामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी इंधन दरवाढीविरोधात शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढ विरोधात शिवसेनेने एल्गार केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात व शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.