कोपरगाव (प्रतिनिधी) -

कोपरगाव तालुका किराणा मर्चन्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र ट्रेडिंग कंपनीचे मालक राजकुमार बंब यांची निवड

झाल्याचे कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी जाहीर केले.

राजकुमार बंब हे राजेंद्र ट्रेडिंग कंपनी या फर्मचे मालक आहेत. जैन समाजाचे भूषण असलेल्या चांदवड येथील नेमीचंद जैन या शिक्षण संस्थेचे विश्वस्त आहेत. तसेच कोपरगावातील जैन ओसवाल समाजाचे प्रमुख असून कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष आहेत. विविध सामाजिक क्षेत्रांत त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. असोसिएशनचे अध्यक्ष कै. मोहनलाल झंवर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली आहे. लवकरच कोपरगाव तालुका किराणा मर्चन्ट्स असोसिएशनची विस्तारित कार्यकारिणी तयार करण्यात येणार असून या कार्यकारिणीत युवकांना देखील स्थान देण्यात येणार असल्याचे राजकुमार बंब यांनी या निवडीप्रसंगी सांगितले. राजकुमार बंब यांचे निवडीबद्दल अरविंद भन्साळी, संजय भन्साळी, चांगदेव शिरोडे, गुलशन होडे, महावीर सोनी, सुधीर डागा, सचिव प्रदीप साखरे, राम थोरे, केशव भवर, बाळासाहेब कुर्लेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.