<p><strong>कोपरगाव । तालुका प्रतिनिधी। Kopergaon </strong></p><p>शहराच्या मध्य वस्तीतील आयेशा कॉलनीत गोवंश जनावरांच्या कत्तल खान्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी १६ जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका केली. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शहर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.</p>.<p>पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या खबरी वरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत टाकलेल्या धाडीत १४ जर्शी गायी तर दोन गावरान गायी असा १६ गायी व त्यांची सुरु असलेली कत्तल त्यांचे गोमांस असा २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज मिळून आला. त्या ठिकाणी आरोपी वसीम फारूक कुरेशी (वय २०), अक्रम फकीर कुरेशी (वय २७), खालील जमाल कुरेशी (वय ३६) सर्व रा.आयेशा कॉलनी संजयनगर कोपरगाव आदींना रंगेहात जेरबंद केले असून आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.</p>