कोपरगाव : मुस्लिम बांधवांनी केले घरीच नमाज पठण

कोपरगाव : मुस्लिम बांधवांनी 
केले घरीच नमाज पठण

सोनेवाडी (वार्ताहर) - कोपरगाव तालुक्यातील चांंदेकसारे येथील ईदगाह मैदानावर यंदा करोनाचे सावट पहावयास मिळाले. मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करत ईद साजरी केली.

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी चांंदेकसारे, घारी, झगडेफाटा येथिल मज्जिदमध्ये जाऊन मौलाना सोबत चर्चा केली. सलग दोन वर्षांपासून करोना महामारीने सामूहिक नमाज पठण करता आले नाही.

अल्लाहत आला या महामारीतून लवकरच देशाला बाहेर काढेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. मुस्लिम बांधवांना घरीच कुराण तसेच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांनीही करोनाचे सावट पाहता घरीच नमाज पठण केले. उपनिरीक्षक कुसारे, पो. कॉ. काळे ईदगाह मैदानावर बंदोबस्तासाठी होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com