पालिकेच्या वतीने लसीकरणाचा उच्चांक

1 हजार 637 नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण
पालिकेच्या वतीने लसीकरणाचा उच्चांक

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत गांधी जयंती निमित्ताने गती घेतली असून, कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शहरातील विविध भागात एका दिवसात 1 हजार 637 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंतचा हा कोपरगाव शहरातील लसीकरणाचा उच्चांक आहे.

तालुक्यात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. प्रारंभी लस कमी येत असल्याने मोहिमेला मर्यादा होत्या. मात्र पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रयत्नांमुळे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कमाल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांची सर्व टीम आणि नगरपरिषद प्रशासन दैनंदिन वार्ड निहाय लसीकरणाचे नियोजन करून शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज अखेर शहरातील पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

गांधी जयंती निमित्त शहरामध्ये तीन पथक करून दत्तमंदिर, दत्तनगर, संत गोरोबाकाका मंदिर, गोरोबा नगर व न. प.शाळा क्र.5 बेट याठिकाणी कोविड प्रतिबंध लसीकरणाचा उच्चांक गाठून आज दिवसा अखेर 1 हजार 637 नागरिकांचे लसीकरण यशस्वीपणे पार पाडले. यासाठी डॉ. गायत्री कांडेकर, रजनी मुसमाडे, लक्ष्मी पाठक, परिचारिका रोहिणी नाईक, सुरेखा कुमावत, शालिनी गायकवाड, नंदू नवले, पूजा नवले, विजया गायकवाड आशा सेविका राखी पुरोहित, मंगल गवळी, वर्ष देसाई, सुरेखा थोरात, सुवर्णा वायखिंडे, योगिता गवूल, अनिता वैद्य, सपना दाभाडे, सोनपसारे,कदम यांच्यासह लसीकरण झालेल्या व्यक्तींची कोव्हीन पोर्टलवर डाटा एन्ट्री यासाठी नियंत्रण अधिकारी भालचंद्र उबरजे, प्रवीण पोटे, पी.के. गायकवाड, सूर्यकांत गाडेकर, नियंत्रण अधिकारी महारुद्र गालट, नोडल अधिकारी ज्ञानेश्वर चाकणे आदींनी नियोजन करून परिश्रम घेतले आहे.

शहरातील विविध भागातील व्यापारी, नागरिक यांची दररोज आरटीपीसीआर व रॅपिड तपासणी कॅम्प नियोजन करून दररोज सरासरी 300 व्यापारी नागरिकांच्या कोविड तपासण्या सुरू आहे. यासाठी नगरपरिषदेचे स्वच्छता विभागाचे कर्मचार्‍यांचे दोन पथक शहरातील विविध भागांमध्ये दैनंदिन कोविड तपासण्या करत आहेत. यासाठी प्रभारी स्वच्छता निरीक्षक सुनील आरण मुकादम मनोज लोट, रवी दिनकर, विजय घोरपडे, विजय डाके, अरुण फाजगे, रणधीर तांबे, योगेश कोपरे, पवन हादा, राजेंद्र तुजारे, तुषार, आनंद वाल्हेकर, दीपक साळवे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदी मेहनत घेत आहे.

कोपरगाव शहर हे करोना मुक्त राहावे यासाठी नगरपरिषद अथक प्रयत्न करत असून पालिकेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी एका दिवसात दोन हजारांपर्यंत नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले असून लसीकरणाचा वेग अजून वाढविण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी स्वतःहून लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्यामुळे यावेळी उत्साहाचे वातावरण शहरात दिसले.

- शांताराम गोसावी, मुख्याधिकारी

Related Stories

No stories found.