कोपरगाव : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा

कोपरगाव : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) / kopargaon - तालुक्यातील तिळवणी येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पती, सासू , सासरे व दोन दिर यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

दि. 14 जुलै 2021 रोजी पती, सासू-सासर्‍यांच्या मानसिक, शारीरिक छळाला कंटाळून सोनाली धनंजय गायके (वय 28) या युवतीने राहते घरी तिळवणी येथे आत्महत्या करून जीवन संपवले. सोनाली हीचा विवाह झाल्यानंतर सहा महिन्यापासून आजतागायत माहेरहून पैसे आण म्हणून सासरच्या लोकांकडून वेळोवेळी तिचा मानसिक व शारीरिक छळ होत होता. छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून मयत सोनालीचे वडील दादासाहेब हरिभाऊ खटकाळे रा. लौकी, दहेगाव यांनी धनंजय भाऊसाहेब गायके (पती), भाऊसाहेब भागाजी गायके (सासरा), लिलाबाई भाऊसाहेब गायके (सासू), सागर भाऊसाहेब गायके (दिर), मनोज भाऊसाहेब गायके (दिर) सर्व राहणार तिळवणी तालुका कोपरगाव यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनि सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com