कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) -

लोखंडी सुर्याचा धाक दाखवून व्यापार्यास रस्त्यात अडवून त्याच्याजवळील 4 लाख 98 हजार नऊशे रुपयांच्या रोख रकमेसह मोबाईल लुटून

नेल्याची घटना शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाईभाई गॅरेजसमोर शुक्रवार रात्री साडे दहाच्या वाजेच्या सुमारास घडली. याबाबत चार अज्ञात चोरट्यांविरुध्द कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

व्यापारी दिलीप शंकर गौड (रा.निवारा) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शहरातील किशोर वाईन्स दुकान सहा महिन्यांपूर्वी चालविण्यास घेतले आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून दुकानातील दिवसभरात जमलेली रोख रक्कम 4 लाख 98 हजार 900 सोबत घेऊन स्कुटीवरून घरी जात होतो. दुसर्या दुचाकीवर दुकानाचा मजूर सचिन साळवे माझ्यासोबत होते. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील भाई मोटार गॅरेजसमोर आलो असता पाठीमागून विनानंबरच्या दोन दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 98 हजार 900 रोख रक्कम एक टॅब व दोन मोबाईल तसेच कागदपत्रे असलेली बॅग लोखंडी सुर्याचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेली.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरुद्ध गु.रजि. नं व कलम 838/2020 भादंवि कलम 397,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे करीत आहेत.