कोपरगाव मतदारसंघांतील रस्त्यांसाठी निधी द्या

ना. गडकरी यांच्याकडे स्नेहलता कोल्हे यांची मागणी
कोपरगाव मतदारसंघांतील रस्त्यांसाठी निधी द्या

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख राज्य मार्ग 8 खराब झालेला आहे. साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळासाठी नव्याने घोषित करण्यात आलेला प्रमुख राष्ट्रीय महामार्ग 752 जी याचे काम सुरू आहे. तेंव्हा राहाता तालुका हद्द ते नाशिक जिल्हा हद्द या अठरा किलोमीटरच्या रस्त्यासाठी तातडीने निधी देऊन याचे काम तात्काळ मार्गी लावावे या मागणीचे निवेदन माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी अहमदनगर येथे दिले.

या निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव तालुक्याचे ऐतिहासिक महत्व मोठे असून त्याचे पर्यटनात महत्व वाढावे. याचा विकास व्हावा व येथील व्यवसायाला गती मिळावी. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल साईबाबा संस्थान शिर्डी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने निधीची तात्काळ गरज आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 राज्यमार्ग 65 संगमनेर तालुका हद्द ते झगडे फाटा चौफुली या 16.5 किलोमीटर लांबीच्या, राज्यमार्ग 7 नाशिक जिल्ह्य ते दर्डे फाटा या 22 किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते, या परिसरात काकडी विमानतळ, आंतरराष्ट्रीय देवस्थान साईबाबा शिर्डी, तसेच कोपरगाव परिसरातील पेशवे राघोबादादा वाडा, साईबाबा तपोभूमी, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, महानुभाव पंथीय श्री कृष्ण मंदिर, ऐतिहासिक कोकमठाणचे लक्ष्मी माता, रामदासी बाबा मंदिर, कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य, कचेश्वर देवस्थान, कुंभारी राघवेश्वर मंदिर, संवत्सर येथील शृंघेरश्रीक्षेत्र मंजूर देवस्थान, धामोरी चे गोरक्षनाथ मंदिर, उक्कडगाव येथील रेणुका माता, कान्हेेगाव गाव येथील नृसिंह मंदिर आदी धार्मिक स्थानांवर दर्शनासाठी दूरवरून येणारे भाविक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करातात.

तसेच शेतकरी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, जिल्हा अंतर्गत वाहतूक करणारे प्रवासी त्यांचे वाहनाने या रस्त्याचा वापर करत असतात, तेव्हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली. त्यास केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Related Stories

No stories found.