कोपरगावच्या विधानसभेवर आ. काळे-कोल्हेंचा दावा

आ. काळे म्हणतात, कोपरगावचे तिकीट राष्ट्रवादीलाच! : आमचेही नेते म्हणतात लगेच एबी फॉर्म देऊ का? - स्नेहलता कोल्हे
कोपरगावच्या विधानसभेवर आ. काळे-कोल्हेंचा दावा

कोपरगाव (प्रतिनिधी)

राज्यातील सत्ता बदलाने एकमेकांचे राजकीय विरोधक सख्खे शेजारी झाले आहेत. त्यात कोपरगावात एकमेकांचे पारंपरीक राजकीय विरोधक असलेले काळे-कोल्हे घराण्याचाही समावेश आहे. कोपरगाव पंचायत समिती कार्यालयात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक होती.

बैठकीत बोलताना आमदार अश्तोष काळे यांनी कोपरगाव विधानसभेचे तिकीट राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे सांगितले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या स्नेहलता कोल्हे यांनी मलाही आमच्या पक्ष श्रेष्ठींनी लगेच एबी फॉर्म देऊ का ? असे विचारले. त्यामुळे पुलाखालून अजून बरेच पाणी वाहून जायचे आहे. आशुतोष काळे उत्साहात बोलून गेले. सध्या शासन आपल्या दारीची चर्चा करू अशी मिश्किल टिपन्नी स्नेहलता कोल्हे यांनी केली.

शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीची आढावा बैठक कोपरगाव पंचायत समिती सभागृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत हा किस्सा घडला. शिवसेनेचा शिंदे गट व भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सामिल झाला. | त्यामुळे अनेक विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलले आहे. एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले उमेदवार आता एकत्र आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हालाच तिकीट मिळणार असा दावा दोन्ही उमेदवारांकडुन केला जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरतो. त्यानंतर कोण बंड करतो यावर निवडणुकीची रंगत वाढणार आहे.

राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे यांनी भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या आठशे मतांनी पराभव केला होता. गत चार वर्षे विधानसभा निवडणूका डोळ्या समोर ठेवत या दोन्ही नेत्यांनी मतदार संघात बांधणी केली. मात्र आता राष्ट्रवादी आणि भाजपा दोघेही सत्तेत सहभागी झालेत. सत्ता बदलाच्या काळात अजित पवारांनी कोपरगावची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच राहणार आणि उमेदवारी ही मलाच दिली जाणार असा शब्द दिल्याचं आमदार काळे यांनी स्नेहलता कोल्हे यांच्या समोरच सांगितले. त्यावर स्नेहलता कोल्हे यांनी मलाही आमच्या पक्ष श्रेष्ठींनी आता एबी फॉर्म देऊ का असे विचारले. त्यामुळे पुलाखालून अजुन बरच पाणी वाहून जायच आहे. आशुतोष काळे उत्साहात बोलून गेल्याचे त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com