शिरसगाव उपबाजार समितीत नवीन-जुने व्यापारी आमने-सामने

नवीन व्यापार्‍यांना लिलावात भाग घेण्यास जुने स्थानिक व्यापार्‍यांचा विरोध
शिरसगाव उपबाजार समितीत नवीन-जुने व्यापारी आमने-सामने

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

तालुक्यातील कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची (Kopargaon Agricultural Produce Market Committee) उपबाजार समिती शिरसगाव तीळवणी (Sub Market Committee Shirasgaon Tilvani) येथे नव्याने सुरू होऊन दोन वर्षे झाली. ही बाजार समिती (Market Committee) कायम वादात सापडली आहे. शुक्रवारी सकाळी उपबाजारात कांदा लिलावासाठी (Onion Auctionz) नवीन लायसन्स धारक व्यापारी व जुने स्थानिक व्यापारी आमने-सामने आले. स्थानिक व्यापार्‍यांनी नवीन व्यापार्‍यांना लिलाव खरेदी करण्यास विरोध केला. यावेळी दोन गटात शेतकर्‍यांसमोरच बाचाबाची झाली. पोलिसांच्या (Police) हस्तक्षेपामुळे वातावरण निवळले.

यावेळी मध्यस्थी करण्यासाठी बाजार समितीकडून सचिव नानासाहेब रणशूर शिरसगाव बाजार समितीत दाखल झाले. स्थानिक व्यापार्‍यांनी आपले म्हणणे मांडले, त्यांनी सांगितले, आम्ही बाजार समितीला लेखी पत्र दिले, आम्ही नवीन लायसन्स धारक व्यापार्‍यांना कांदा लिलाव (Onion Auction) करून देणार नाही. नवीन लायसन्स धारक व्यापार्‍यांना कोपरगाव मुख्य बाजार समितीत (Kopargaon Main Market Committee) वर्ग करावे.

बाजार समितीने अजून आम्हाला उत्तर दिले नाही. पर्यायी मार्ग सुद्धा काढला नाही. लवकर दोन्ही गटातील व्यापार्‍यांची बैठक (Meeting) घेऊन वाद मिटवणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. नवीन लायसन्स धारकांनी म्हणणं मांडल की, आम्ही रितसर लायसन्स काढलेले आहे. आम्हाला खरेदी करण्याची परवानगी आहे. कोणी अडधळा आणू नये.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपस्थित झाले व गर्दीवर नियंत्रण आणले.

हायकोर्टाने मुदत संपलेल्या संचालक मंडळाला मुदत वाढून दिली. मात्र धोरणात्मक निर्णय घेण्यास बंधी घातली आहे.नवीन व्यापार्‍यांना लायसन्स देणे हा मुद्दा धोरणात्मक निर्णय मध्ये येत नाही. यात सर्वप्रथम शेतकर्‍यांचा विचार करावा लागतो. शुक्रवारी झालेल्या गोंधळाबाबत डीडीआरशी चर्चा करून निर्णय घेऊ.

- नामदेव ठोंबळ, कोपरगाव बाजार समिती प्रशासक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com