दारूचा ट्रक लुटणारा कोपरगावचा आरोपी जेरबंद

दारूचा ट्रक लुटणारा कोपरगावचा आरोपी जेरबंद

एलसीबीची नगरमध्ये कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - दारू वाहतूक करणार्‍या वाहनाची लूट करणार्‍या टोळीतील एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगरमध्ये अटक केली. संतोष गौतम खरात (वय 29 रा. भोजडे चौकी ता. कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शरद गोपीनाथ वरगुडे (रा. संवत्सर ता. कोपरगाव) यांनी त्यांच्या ओळखीचे ट्रान्सपोर्ट मालक शैलेश रावल (रा. कोपरगाव) यांच्या ट्रान्सपोर्ट मार्फत शंकरराव काळे साखर कारखाना येथून 25 फेब्रुवारीला सात लाख 28 हजार रुपयांची देशी दारू ट्रकमध्ये भरली होती. ती त्यांना नांदेड येथे खाली करायची होती. झगडे फाटा येथे रात्री 10 वाजता संतोष गौतम खरात, त्याचा साथीदार योगेश कैलास खरात, धनंजय प्रकाश काळे (सर्व रा. भोजडे चौकी) व एक अनोळखी यांनी वरगुडे यांना मारहाण करून ट्रक दारूसह बळजबरीने चोरून नेला होता.

याप्रकरणी वरगुडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील आरोपी संतोष खरात हा नगरमधील सह्याद्री चौकात आला असल्याची खबर पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी आपले पथक पाठवून खरात याला अटक केली. आरोपी खरात विरोधात कोपरगाव, चाळीसगाव, लासलगाव, सिलेगाव, येवला पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, रस्तालुट असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com