कोपर्डी प्रकरणाची सुनावणी तहकूब

कोपर्डी प्रकरणाची सुनावणी तहकूब

अहमदनगर | Ahmedagar

राज्यभर गाजलेल्या कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची (kopardi rape and murder case) सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) न्यायमूर्ती साधना जाधव (Justice Sadhana Jadhav) आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण (Justice Prithviraj Chavan) यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आली होती.

दरम्यान सदर प्रकरण तांत्रिक कारणामुळे आपल्यासमोर चालविण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला. त्यामुळे सदर प्रकरण आता दुसऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग होणार आहे. त्यानंतर नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती उच्च न्यायालयातील विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव (Special Public Prosecutor Umesh Chandra Yadav) यांनी दिली. (kopardi case high court latest update)

कोपर्डी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या (latest news kopardi rape and murder case) अनुषंगाने अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने (Ahmednagar District Sessions Court) या प्रकरणातील तीनही आरोपीना खून आणि अत्याचार या आरोपांसाठी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयातील (high court) सुनावणी आता दृष्टीक्षेपात आल्यामुळे पीडित मुलीच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. (kopardi rape and murder case news)

Related Stories

No stories found.