कोपर्डी प्रकरण : 'मुख्यमंत्री साहेब, माझ्या छकुली ला न्याय मिळवून द्या', पीडित कुटुंबाची आर्त हाक..

कोपर्डी घटनेला आज पाच वर्ष पूर्ण
कोपर्डी प्रकरण : 'मुख्यमंत्री साहेब, माझ्या छकुली ला न्याय मिळवून द्या', पीडित कुटुंबाची आर्त हाक..

कर्जत | प्रतिनिधी

संपूर्ण देशाला हादरवणारी घटना कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) या ठिकाणी १३ जुलै २०१७ रोजी घडली होती. या घटनेला आज पाच वर्ष झाली आहे मात्र अजूनही या घटनेतील नराधमांना कोणतीही शिक्षा झालेली नाही.

यामुळे या प्रकरणात मृत्यू पावलेली पीडिता व तिचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली. मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व नागरिक उपस्थित होते.

आजही या घटनेच्या आठवणीने पीडितेची आई तिच्या आठवणीने हुंदके देत आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या भावना ना आवर घालत पीडितेची आई पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, 'आज या घटनेला पाच वर्षे झाली पण अजून आम्हाला व माझ्या छकुलीला न्याय मिळालेला नाही. या पूर्वीचे राज्यातील सरकार व विद्यमान सरकार हे सर्व जण आम्हाला न्याय मिळेल असे केवळ आश्वासन देत आहेत. आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घालून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये (Fast track court) चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही.'

पीडितेचे वडील आजही या घटनेमधून सावरले नाहीत. आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांच्या डोळ्यांमध्ये आजही दिसून येतो. मी माझं सर्वस्व गमावले आहे. आज या घटनेला पाच वर्षे झाले तरीही ते नराधम अजूनही जिवंत आहेत. साहेब आम्हाला न्याय मिळेल का? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. नगर येथील सत्र न्यायालयात १६ महिन्यांमध्ये निकाल लागून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. परंतु पुढे काही झाले नाही. आमच्या सोबत पारनेर येथील खटल्याचा निकाल देखील लागला. आरोपींना फाशीची शिक्षा झाली. आम्ही मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असून आणखी किती दिवस आम्हाला न्यायासाठी वाट पहावी लागेल' अशी भावना पीडिता चे वडील यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com