कोंभाळणेतील ठाकर वस्तीवर आग, चार कुटुंब उघड्यावर

कोंभाळणेतील ठाकर वस्तीवर आग, चार कुटुंब उघड्यावर

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील कोंभाळणे शिवारातील ठाकर वस्तीतील युवराज गांगड यांचे व इतर तीन घरे आगीने भस्मसात झाले

असून शेळ्या, मोटरसायकल, पैसे, धान्य, कपडे, कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून हे चार कुटुंब उघड्यावर आले आहे.

कोंभाळणे शिवारात गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ठाकर वस्ती आहे. तिथे युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, सखुबाई गावंडे असे चार कुटुंब व सात मुले राहतात. नारायण गाव, संगमनेर येथे शेतीच्या कामावर मजुरी करून या आदिवासी ठाकर कुटुंबांनी आपल्या घरात धान्य साठविले होते.

संगमनेर येथे आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी यातील दोन महिला व छोटी मुले सोडली तर सर्वजण संगमनेरला गेले असताना दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने आपल्या घरास आग लावल्याचे संशय येताच या महिलांनी धावपळ केली मात्र जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने त्यांना यश आले नाही. घरातील चाळीस पोती धान्य, शेळ्या, पैसे, कागदपत्रे, संसार उपयोगी साहित्य सर्व आगीत भस्म झाले.

उघड्या डोळ्यांनी आपले घर पेटताना त्यांनी पाहिले. त्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले आहे.घरात झोपलेला दोन वर्षाचा मुलगा सखुबाई ने आगीत घुसून बाहेर काढला तर एका बकरीचे पाय ओढत बाहेर आणले ती त्यात पन्नास टक्के भाजली आहे. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार मुकेश कांबळे यांनी स्थानिक तलाठी उपलब्ध नसल्याने सर्कल कुलकर्णी व समशेरपुर येथील तलाठी पाठवून पंचनामा केला आहे.

पोलिस पाटील यांनी अकोले पोलिसांना खबर दिली आहे. या घरातील लहान मुलांनी आपले घर जाळले असून आम्हाला ते भरून द्यावे अशी मागणी केली आहे. तर महिला आपल्या व्यथा मांडताना अक्षरशः रडत होत्या. सुयश गावंडे-आमचे घर जळाले, धान्य जळाले पत्रे वाकले आता आम्ही कुठे राहायचे असे त्यांनी सांगताना उपस्थित ग्रामस्थ गहिवरले.

माजी आमदार वैभवराव पिचड यांना पीडित कुटुंबातील व्यक्तींनी संपर्क केला असता त्यांनी तातडीने तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून गरीब कुटुंबाला मदतीचे आवाहन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com