कोळपेवाडीच्या विवाहितेची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

कोळपेवाडीच्या विवाहितेची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगाव (प्रतिनिधी)

तालुक्यातील कोळपेवाडी येथील विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून पुण्यात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. पती चारित्र्यावर संशय घेवून वारंवार मारहाण करीत असल्याने वृषाली हिने टोकाचे पाऊल उचलले. दोन वर्षापुर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता.

कोळपेवाडी येथील शंकरराव काळे कारखाना कॉलनी येथील रहिवासी हमाल शिवाजी शेंडगे यांनी मुलगी वृषाली हिस आयटी इंजिनिअर करत उच्च शिक्षण दिले. संजिवनी इंजिनिअरींग कॉलेजची टॉपर विद्यार्थिनी होती.

कोळपेवाडी येथील शशिकांत सखाराम कोळपे या तरुणाशी तिचा विवाह लाऊन दिला. मुलगी व जावई पुणे येथे खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असताना शशिकांत हा नेहमी वृषाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असे. सासु शांताबाई कोळपे, दीर मच्छिंद्र कोळपे, किरण कोळपे हे तुम्ही गरीब घरातील असतांना आम्ही तुमची मुलगी केली. ११ लाख रुपये पॅकेज वाला मुलगा संभांळता येत नाही. आम्ही मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ आम्हास फारकत पाहिजे असे म्हणून कायम अपमानास्पद वागणूक दिली.

या जाचाला कंटाळून वृषाली हिने लिना अपार्टमेंट, पिंपळे गुरव पुणे या राहत्या घरी आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताचा भाऊ अक्षय शेंडगे याने सांगवी पोलीस ठाण्यात दाखल केली. वरील चार आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नंबर ३५१/२०२१ अन्वये ३०६, ४९८अ, ३२३, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक कोळपेवाडी येथे आले असता आरोपी पसार झाल्याने पथकास रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. सांगवी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक के. एस. गवारी अधिक तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com