कोळपेवाडी महेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीला

कोळपेवाडी महेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिरातील दानपेटी बुधवारी पहाटे चोरीला गेली. ही घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली. ग्रामस्थांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध करत पोलिसांनी त्वरित चोरास जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

कोळपेवाडीचे आराध्य दैवत महेश्वर मंदिरातील दान पेटी बुधवारी पहाटे तोंडाला मास्क बांधलेल्या दोघांनी चोरून नेल्याची घटना घडली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट देवुन चोरीचा घटनाक्रम तपासत ग्रामस्थांना चोरांचा लवकरच तपास करून त्यांना ताब्यात घेऊ, असे आश्वासन दिले. महादेव मंदिराचे पुजारी झोपत असलेल्या रुमला बाहेरून कडी लावून खंडोबा मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरांनी महेश्वर मंदिराच्या गाभार्‍या समोरील वजनाने जड असलेली दानपेटी चोरून नेली.

सकाळी आरतीच्या वेळेस ग्रामस्थांना दानपेटी चोरीला गेल्याचे आढळून आल्याने सीसी टिव्ही कॅमेरे तपासले असता दोन चोर पहाटे दानपेटी घेऊन जाताना आढळले. गावच्या पश्चिम दिशेला चांगदेव बारकु पाटील विद्यालयामागील चारीत दानपेटी तुटलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांना आढळून आली. माजी सरपंच सूर्यभान कोळपे यांनी दानपेटीमध्ये जवळपास 20 हजारांहून अधिक रक्कम असल्याचे सांगत चोरीच्या घटनेचा निषेध केला.

कोळपेवाडी सुरेगाव परिसरात पंधरा दिवसांतील चोरीची ही तिसरी घटना आहे. परिसरात दुकान फोडीच्या अनेक घटना घडून देखील अद्याप एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणा लावू शकली नसल्याने चोरांनी मंदिराच्या दान पेट्यांना लक्ष्य केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com