कोळपेवाडीत लंम्पी आजाराचे थैमान, दोन जनावरे दगावली

पशुधन विकास अधिकारी पद रिक्त
कोळपेवाडीत लंम्पी आजाराचे थैमान, दोन जनावरे दगावली

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोळपेवाडी (Kolpewadi) पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer) पद एक महिन्यापासून रिक्त असल्याने जनावरामध्ये लंम्पी आजराणे (Lappi disease) थैमान घातले असून दोन जनावंरे दगावली (Animals Death) आहे. त्यामुळे पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खाजगी डॉक्टर कडून उपचार करण्यासाठी किमान चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी (Farmer) वर्गासह पशु पालक हैराण झाले आहे.

कोळपेवाडी पशुधन विकास अधिकारी किरण खर्डे (Kolpewadi Livestock Development Officer Kiran Kharde) यांची 15 सप्टेंबरला बदली होऊन ते राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) रूजू झाले. त्या अगोदर कोळपेवाडीत (Kolpewadi) नवीन पशुधन विकास अधिकारी रुजू होणे गरजेचे असताना आज महिना उलटून देखील अधिकारी हजर न झाल्याने पशुधन उपचार सेवा राम भरोसे बनली आहे. त्यातया परीसरात लंम्पी आजाराने थैमान घातले आहे. देेशी बरोबर संकरीत गायीना आजाराची लक्षणे दिसून येत आहे. अंगावर गाठी गाठी येेेवुन त्यातुन रक्त स्राव होतो. यावेळी जनावर चारा पानी सोडून देत असल्याने वजन घटुन जनावरे कमालीचे अशक्त बनते. खाजगी डॉक्टरांची सेेवा घेण्यापलीकडेे पशुु पालकाना पर्याय उरला नाही.

हा आजार संसर्गजन्य असल्याने ऐकापासुन दुसर्‍या जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत जातो. या आजारावर लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते केवळ जनावरांच्या तापावर नियंत्रण ठेवण्यात औषध उपचार केले जातात. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पशुसंवर्धन विभागाने खाजगी लस उपलब्ध (Private Vaccines) करून पशुधनामधील आजार आटोक्यात ठेवल्याची चर्चा झडत आहे. मात्र बाधित सरकारी आकडेवारी जाहीर नाही. संसर्गजन्य आजारामध्ये (Infectious Diseases) लाळ्याखरकुत, फर्र्‍या, घटसर्प आणि आता थैमान घालीत असलेला लंम्पी यावर वेळीच लसीकरण करणे जिल्हा परिषद (ZP) पशुसंवर्धन विभागाचे कर्तव्य असताना त्यांनी केलेली डोळे झाक करून पशुधन वार्‍यावर सोडण्याचा प्रकार आहे.

साखर कारखाना (Sugar Factory) हंगाम सुरू होणार असल्याने ऊस तोडणी कामगाराची बैल, जनावरे मोठ्या प्रमाणात या परिसरात दाखल होतील. त्यांना लसीकरण (Vaccination) झाले आहे की नाही याची सरकारी आकडेवारी उपलब्ध नसल्याने आजाराचे थैमान झाल्यास त्यास जबाबदार कोण असेल असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. येत्या आठ दिवसात कोळपेवाडी पशूधन विकास अधिकारी (Kolpewadi Livestock Development Officer) पदी (Post) पुर्णवेळ अधिकारी न नेमल्यास श्री साई सेवा प्रतीष्ठाणच्यावतीने जिल्हा परिषदेपुढे आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष रमेश भोंगळ यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com