कोळपेवाडी ग्रामसेवकावर तीन वेळा शास्तीची कारवाई

कोळपेवाडी ग्रामसेवकावर तीन वेळा शास्तीची कारवाई

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील कोळपेवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवक बी. एस. आमरे यांना जनाबाई शिंदे यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती न पुरवल्याबद्दल राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक के. एल. बिश्नोई यांनी 15 हजार रुपये शास्तीची कारवाई केली. 3 वेळेस कारवाई होणारे हे राज्यातील बहुधा पहिले उदाहरण ठरू शकते. जनाबाई चंद्रकांत शिंदे यांनी कोळपेवाडी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकार अंतर्गत 2017 मध्ये गावात किती मुतार्‍या व शौचालये बांधलेली आहेत तसेच लक्ष्मीआई मंदिराजवळ बांधकाम केलेल्या खोल्यांचे मोजमाप व बखळ जागा यांची माहिती मागितली होती.

अर्जाला अनुसरून बी. एस. आमरे यांनी हेतुपुरस्सर चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पुरवून अपिलार्थीस माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 (1) अन्वये शास्तीची कार्यवाही करण्यात का येऊ नये याचा खुलासा आयोगाकडे सादर करण्याचे सांगितले. खुलासा सादर न केल्याने आयोगाने 2665/2667/2017 मधील शास्तीची कार्यवाही 6 ऑक्टोबर 2021 ला कायम करत दोन्ही प्रकरणांत प्रत्येकी 5000 हजार रुपये दंडाची शास्ती केल्याचे आदेश कायम केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

2668 प्रकरणांमध्ये देखील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सुभाष पवार यांना दहा तर बी. एस. आमरे यांना पाच हजार दंड करण्यात आला. शासकीय सेवा पुस्तकात लोकसेवक यांंच्या चांगल्या व वाईट वर्तणुकीची नोंद केली जाते बढतीच्या वेळेस सेवा पुस्तक तपासले जाते. शास्तीची नोंद सेवा पुस्तकात होते का नाही यासाठी आपला लढा यापुढे राहील, असे जनाबाई शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com