कोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना जोर

कोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणूक 
बिनविरोध करण्याच्या हालचालींना जोर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील पश्चिम भागात काळे गटाच्या बालेकिल्ल्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या पारावरील चर्चेने जोर पकडला असून काळे-कोल्हे समझोता एक्सप्रेस मतदारांना कितपत पचनी पडेल हे 7 डिंसेंबरला उघड होणार आहे.

कोळपेवाडी ग्रामपंचायतीवर राजकीयदृष्ट्या सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत स्थापनेपासून काळे गटाने साम, दाम, दंड, भेद नितीचा अंवलब करत सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्व प्रयत्नांची आजतागायत पराकाष्ठा केली आहे. दोन वेळेस मतदान होऊन देखील काळे गटाने संरपच पदासह तेरा पैकी तेरा सदस्य निवडून आणत कोल्हे गटाला अस्मान दाखवले. काळे गटातील युवा नेतृत्वाची कोल्हे गटाशी वाढलेली जवळीक निवडणुकीत अर्ज माघारी घेतेवेळी फट फजिती होवु नये यासाठी एकहाती सत्तेवर आपलाच अंमल कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे.

उमेदवारी देण्यात आलेले उमेदवार निवडून येण्यास कसे योग्य आहे, हे नेत्यांना पटवण्यात ते यशस्वी झालेले आहे. ग्रामपंचायत बिनविरोध होण्याच्या पारावरील गप्पा थंडीतही उब निर्माण करत आहे. तर शेतकरी रब्बीची पेरणी करण्याच्या कामात व्यस्त असून कष्टकरी वर्ग रोजदांरीच्या शोधात आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेला सोमवार दि. 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. काळे-कोल्हे गटा बरोबर तिसरी आघाडी उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी कामाला लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com