कोल्हेवाडी सोसायटी निवडणूक 13 जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात

कोल्हेवाडी सोसायटी निवडणूक 13 जागेसाठी 26 उमेदवार रिंगणात

समनापूर |वार्ताहर| Samnapur

संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या कोल्हेवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या 13 जागेसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे व इंद्रजित थोरात यांचे मार्गदर्शनाखालील शेतकरी विकास मंडळ तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे, कै. भास्करराव दिघे पाटील (आप्पा) यांचे मार्गदर्शनाखाली जनसेवा विकास मंडळ अशी सरळ लढत होणार आहे.

कोल्हेवाडी सेवा सोसायटीचे संचालक मंडळ निवडणुकीत 13 जागेसाठी 2 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 1007 मतदार आहेत. जनसेवा विकास मंडळाकडून सर्वसाधारण मतदार संघातून भाऊसाहेब तुकाराम काळे, पोपट सावळेराम कोल्हे, विश्वनाथ मुरलीधर खुळे, सोपान गंगाराम खुळे, दादासाहेब नामदेव गुंजाळ, रमेश सुखराम दिघे, राहुल भास्कर दिघे, साहेबराव कुंडलिक वामन, महिला राखीव मतदार संघातून मीराबाई दत्तू कोल्हे, भीमाबाई रामनाथ दिघे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून रामनाथ काशिनाथ कांबळे, इतर मागासवर्ग मतदार संघातून जालिंदर मच्छिंद्र दिघे, भटके विमुक्त जाती जमाती मतदार संघातून संपत निवृत्ती जेडगुले असे एकूण 13 उमेदवार उभे केले आहे.

तर शेतकरी विकास मंडळाचे सर्वसाधारण मतदार संघातू अप्पासाहेब भिका कोल्हे, बाबासाहेब रामनाथ कोल्हे, लक्ष्मण रावसाहेब कोल्हे, दिलीप माधव खुळे, राजेंद्र देवराम दिघे, बाळासाहेब दशरथ दिघे, वसंत विश्वनाथ दिघे, बाबासाहेब विष्णू वामन, महिला राखीव मतदार संघातून मंदाताई पुंजाहरी गुंजाळ, ताराबाई आनंदा दिघे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून बाळासाहेब नाना गायकवाड, इतर मागासवर्ग मतदार संघातून रंगनाथ दशरथ खुळे, भटके विमुक्त जाती जमाती मतदार संघातून रामदास दिगंबर वैष्णव असे 13 उमेदवार उभे केले आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र वाकचौरे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विलास कोल्हे हे काम पाहत आहे.

Related Stories

No stories found.