
कोल्हार |वार्ताहर| Kolhar
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल शनिवार दि. 25 जून 2022 रोजी गव्हाची 24 क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2000 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 2125 रुपये भाव मिळाला.
गव्हाला सरासरी 2075 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात सोयाबीनची 3 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी 6000 रुपये भाव मिळाला. मक्याची 2 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी 1850 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.