कोल्हार उपबाजारात गहू 2219 तर सोयाबीन 6500 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2219 तर सोयाबीन 6500 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात बुधवारी गव्हाची 9 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2100 रुपये तर जास्तीत जास्त 2219 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2150 रुपये क्विंटल भाव मिळाला. तसेच सोयाबीनची 10 क्विंटल आवक झाली.

सोयाबीनला सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मक्याची 6 क्विंटल आवक झाली. मक्याला प्रति क्विंटल कमीत कमी 2000 रुपये तर जास्तीत जास्त 2205 रुपये भाव मिळाला. मक्याला सरासरी प्रति क्विंटल 2100 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याची 5 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला प्रति क्विंटल कमीत कमी 3600 रुपये तर जास्तीत जास्त 4200 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4100 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com