कोल्हार उपबाजारात गहू 2240 तर सोयाबीन 6775 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2240 तर सोयाबीन 6775 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल बुधवार दि. 18 मे 2022 रोजी गव्हाची 16 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2050 रुपये तर जास्तीत जास्त 2240 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2150 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच सोयाबीनची 11 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल कमीत कमी 6581 रुपये तर जास्तीत जास्त 6775 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 6675 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. मक्याची 6 क्विंटल झाली. मक्याला सरासरी 2100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

हरभर्‍याची 3 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला प्रति क्विंटल कमीत कमी 4150 रुपये तर जास्तीत जास्त 4200 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4175 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com