कोल्हार उपबाजारात गहू 2276 तर सोयाबीन 6500 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2276 तर सोयाबीन 6500 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल गुरुवार दि. 5 मे 2022 रोजी गव्हाची 10 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2050 रुपये तर जास्तीत जास्त 2276 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2160 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच सोयाबीनची 9 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 6500 रुपये क्विंटल भाव मिळाला. मक्याची 8 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी प्रतिक्विंटल 2100 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.